नमस्कार,
स्पर्धेच्या
पलिकडे (Beyond Competition) या ॲकेडमीमध्ये
आपले स्वागत आहे. आजमितीस जमिनविषयक खटल्यांची संख्या भारतात ३.२ कोटी एवढी आहे व
एकट्या महाराष्ट्रात ३७ लाख खटले सुरु आहेत. लॉ कॉलेज मधून दरवर्षी हजारो लॉ पदवीधर
बाहेर पडत आहेत. परंतु, गेल्या ५ वर्षात कायदा शिकलेल्या अनेक विद्यार्थ्याांना सातबारा
व जमिनविषयक गुंतागुंतीची कागदपत्रे यांचे आकलन होत नाही. त्यामुळे ‘कायदेविषयक साक्षरता’ ही जमिनीबद्दल जेवढी आवश्यक तेवढी कदाचित अन्य कोणत्याही क्षेत्रात
नसेल. म्हणून जमिनीच्या कायद्याचे मुलभूत प्रशिक्षण देणारी व मार्गदर्शन करणारी Beyond Competition ही ॲकेडमी आम्ही सुरु करीत आहोत.
शुभेच्छांसह...
No comments:
Post a Comment